Sunday, 24 July 2011

भारताची पाकिस्तानवरील लष्करी कारवाई..


बरेच जण असा तर्क मांडतात की ज्या प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानात लष्करी कारवाई करून ओसामा बिन लादेनला मारले त्याच प्रकारे भारतानेही पाकिस्तानात लष्करी कारवाई करून दाउद आणि इतर अतिरेक्यांना मारावे.
या बाबत माझे मत असे की..अमेरिका, ओसामा आणि दाउद हे तीनही संदर्भ पाकिस्तान बरोबर जोडले गेले आहेत. पाकिस्तान मधील कारवाई बाबत भारत आणि अमेरिका यांची तुलना होऊ शकत नाही.
पाकिस्तान हा जगातील सर्वात भिकार आणि कंगाल देश असून तो अमेरिकेच्या कर्जा खाली पूर्ण पणे दबलेला आहे. त्याच बरोबर आज घडीला पाकिस्तान मध्ये अमेरिकेचे दीड लाख सशस्त्र सैनिक गेल्या अनेक वर्षान पासून वेग वेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्या जोडीला अमेरिकेचा प्रचंड संहारक शस्त्र साठा, हेलीकोप्टर्स, विमाने, रणगाडे उपलब्ध आहेत. त्याच बरोबर आजू बाजूच्या अनेक देशान मधेही अमेरिकेचे लाखो सैनिक आहेत. त्या व्यतिरिक्त अरबी समुद्र आणि आखातातील समुद्रा मध्ये आण्विक अस्त्र असलेले अनेक जहाजे आणि पाणबुड्या गस्त घालत आहेत. अमेरिका जशी जगातील मोठी लष्करी ताकत आहे त्याच बरोबर आर्थिक ताकतही आहे. या बरोबरच जगावर दादागिरी करणारा देश म्हणूनही अमेरिका "कुप्रसिद्ध" आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता अमेरिकेच्या पाकिस्तान मधील कारवाईला पाकिस्तानच काय पण जगातील कोणताही देश विरोध करणार नाही हे अमेरिकेलाही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. या बाबत अफगाणिस्तान आणि इराकचे उदाहरण सर्वांच्या डोळ्या समोर आहेच. म्हणून अमेरिकेने पाकिस्तान मध्ये काहीही केले तरी पाकिस्तान अमेरिकेचं काहीही वाकडे करू शकणार नाही, उलट अमेरिकेच्या कारवाईचे एक तर समर्थन करावे लागेल अथवा मुग गिळून गप्प तरी बसावे लागेल अशी त्यांची अवस्था आहे. जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांनी एक वाक्य उद्गारले होते...If Pakistan do not refrain from helping the terrorist, we will Bomb them to the stone age. म्हणजे विचार करा पाकिस्तानला पाषाण युगात पाठवण्याचीही तयारी यांच्याकडे आहे.
समजा भारताने अशी लष्करी कारवाई करायचेच ठरवले तर सर्व प्रथम अमेरिकाच पाकिस्तानच्या बचावासाठी त्यांच्या मागे उभी राहील. त्या नंतर चीन आणि इतर अरब व मुस्लीम राष्ट्रेही भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करतील. अशा सर्वच बाबींचा विचार केला तर हे स्पष्ट होते कि पाकिस्तान वरील कारवाई बाबत भारत आणि अमेरिका यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही.
अमेरिकेच्या पाकिस्तान वरील कारवाईने भारतालाही पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र आहे हे जगाला पटउन देण्याची एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. ओसामा आमच्या हद्दी मध्ये नाही हे पाकिस्तान नेहमी सांगत आला होता. मात्र ओसामा पाकिस्तानातच ठार झाल्याने आणि ते ही अमेरिकेनेच ठार केल्याने पाकिस्तान सर्व जगामध्ये उघडा आणि खोटा पडला आहे. दाउद इब्राहीम, मौलाना मसूद, टायगर मेमन हे भारतामध्ये वॉनटेड असलेले दहशतवादी पाकिस्तानातच आय.एस.आय. च्या आश्रयाला असल्याचे पुरावे देऊन देखील पाकिस्तान त्याचा नेहमी इन्कारच करत आला आहे. इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपला आहे हे अमेरिकेने दोन वर्षान आधीच सांगूनही पाकिस्तानने त्याचा इन्कार केला होता व आता तीच गोष्ट उघड झाली आहे. त्यामुळे भारताच्या दाव्यांना देखील पुष्टी मिळाली असून जागतिक समुदायाने पाकिस्तानवर दबाव आणून भारताचे हे गुन्हेगार भारताच्या ताब्यात दयायला पाकिस्तानला भाग पडावे अथवा भारताने अशी लष्करी कारवाई केलीच तर त्याच्या मागे ठांबपणे उभे राहावे.
दहशतवादा विरोधातील कारवाई मध्ये पाकिस्तान हा जगा बरोबर नसून तोच दहशतवाद आणि दहशदवादी पोसत आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. एक ओसामा बिन लादेन ठार झाला असला तरी असे अनेक लादेन, दाउद, अल झवाहिरी, मौलाना मसूद, कसाब, टायगर मेमन हे पाकिस्तानात राजरोस पणे निर्माण केले जात आहेत. या जगामधून दहशतवादाचा बिमोड करायचा असेल आणि शांती हवी असेल तर पाकिस्तान सारख्या दहशतीच्या पोशिंद्यालाच जबर दहशत बसेल अशी कारवाई त्याच्यावर करावी लागेल.

No comments:

Post a Comment