Sunday, 24 July 2011

"टाईम पास"च्या पलीकडे...


फेसबुक हे मैत्रीचे असे साधन (व्यासपीठ) आहे जिथे तुम्हाला मित्र तर मिळतात, पण त्यांच्याशी जोडणारा "भाव" नाही मिळत. चेहरा नसलेले, भावना नसलेले आणि कोणताही संबंध नसलेले नाते इथे जोडले जाते. फ्रेंड्स लिस्ट मधील आकडा तेवढा वाढत जातो परंतु "ओळख" काही वाढत नाही. समोरच्या व्यक्ती विषयी वाटणारा जिव्हाळा..आपलेपणाचा अधिकार फारच कमी लोक निर्माण करतात. "टाईम पास"च्या पलीकडे किंवा आपले "कर्तुत्व" सिद्ध करण्या पलीकडे ऋणानुबंध जपणारे "मनस्वी" फारच कमी. आपल्याला वैयक्तिक पणे भेटणाऱ्या मित्रांना आपण किती वेळ देतो? त्यांची किती वेळा मना पासून विचारपूस करतो? आपल्या स्वताच्या बाबतीत असे कितीजण करतात? या सर्व गोष्टींचा शोध घेतला तर या नात्यांना "व्यवहारी" नात्यां पेक्षा फारच कमी किंमत उरलेली दिसते.
इंटरनेटच्या शोधाने जग जवळ येत चालले आहे असे म्हटले जाते. पण हा जवळीक पणा व्हर्चुअल दुनिये पुरताच मर्यादित आहे. त्या एका फायद्या पलीकडे पाहिलेत तर वैयक्तिक नात्यांची घट्ट पकड या "नेट" च्या नात्यां मध्ये नसते..आणि तरीही आपण वैयक्तिक गाठी भेटीतल्या मित्रां पेक्षा नेट च्या मित्रां बरोबर तासन तास घालवतो.

No comments:

Post a Comment