Sunday, 24 July 2011

भारताची पाकिस्तानवरील लष्करी कारवाई..


बरेच जण असा तर्क मांडतात की ज्या प्रकारे अमेरिकेने पाकिस्तानात लष्करी कारवाई करून ओसामा बिन लादेनला मारले त्याच प्रकारे भारतानेही पाकिस्तानात लष्करी कारवाई करून दाउद आणि इतर अतिरेक्यांना मारावे.
या बाबत माझे मत असे की..अमेरिका, ओसामा आणि दाउद हे तीनही संदर्भ पाकिस्तान बरोबर जोडले गेले आहेत. पाकिस्तान मधील कारवाई बाबत भारत आणि अमेरिका यांची तुलना होऊ शकत नाही.
पाकिस्तान हा जगातील सर्वात भिकार आणि कंगाल देश असून तो अमेरिकेच्या कर्जा खाली पूर्ण पणे दबलेला आहे. त्याच बरोबर आज घडीला पाकिस्तान मध्ये अमेरिकेचे दीड लाख सशस्त्र सैनिक गेल्या अनेक वर्षान पासून वेग वेगळ्या ठिकाणी तैनात आहेत. त्यांच्या जोडीला अमेरिकेचा प्रचंड संहारक शस्त्र साठा, हेलीकोप्टर्स, विमाने, रणगाडे उपलब्ध आहेत. त्याच बरोबर आजू बाजूच्या अनेक देशान मधेही अमेरिकेचे लाखो सैनिक आहेत. त्या व्यतिरिक्त अरबी समुद्र आणि आखातातील समुद्रा मध्ये आण्विक अस्त्र असलेले अनेक जहाजे आणि पाणबुड्या गस्त घालत आहेत. अमेरिका जशी जगातील मोठी लष्करी ताकत आहे त्याच बरोबर आर्थिक ताकतही आहे. या बरोबरच जगावर दादागिरी करणारा देश म्हणूनही अमेरिका "कुप्रसिद्ध" आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता अमेरिकेच्या पाकिस्तान मधील कारवाईला पाकिस्तानच काय पण जगातील कोणताही देश विरोध करणार नाही हे अमेरिकेलाही चांगल्या प्रकारे ठाऊक आहे. या बाबत अफगाणिस्तान आणि इराकचे उदाहरण सर्वांच्या डोळ्या समोर आहेच. म्हणून अमेरिकेने पाकिस्तान मध्ये काहीही केले तरी पाकिस्तान अमेरिकेचं काहीही वाकडे करू शकणार नाही, उलट अमेरिकेच्या कारवाईचे एक तर समर्थन करावे लागेल अथवा मुग गिळून गप्प तरी बसावे लागेल अशी त्यांची अवस्था आहे. जॉर्ज बुश हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष असतांना त्यांनी एक वाक्य उद्गारले होते...If Pakistan do not refrain from helping the terrorist, we will Bomb them to the stone age. म्हणजे विचार करा पाकिस्तानला पाषाण युगात पाठवण्याचीही तयारी यांच्याकडे आहे.
समजा भारताने अशी लष्करी कारवाई करायचेच ठरवले तर सर्व प्रथम अमेरिकाच पाकिस्तानच्या बचावासाठी त्यांच्या मागे उभी राहील. त्या नंतर चीन आणि इतर अरब व मुस्लीम राष्ट्रेही भारताच्या विरोधात पाकिस्तानला मदत करतील. अशा सर्वच बाबींचा विचार केला तर हे स्पष्ट होते कि पाकिस्तान वरील कारवाई बाबत भारत आणि अमेरिका यांची तुलना कुठेच होऊ शकत नाही.
अमेरिकेच्या पाकिस्तान वरील कारवाईने भारतालाही पाकिस्तान हे एक दहशतवादी राष्ट्र आहे हे जगाला पटउन देण्याची एक चांगली संधी प्राप्त झाली आहे. ओसामा आमच्या हद्दी मध्ये नाही हे पाकिस्तान नेहमी सांगत आला होता. मात्र ओसामा पाकिस्तानातच ठार झाल्याने आणि ते ही अमेरिकेनेच ठार केल्याने पाकिस्तान सर्व जगामध्ये उघडा आणि खोटा पडला आहे. दाउद इब्राहीम, मौलाना मसूद, टायगर मेमन हे भारतामध्ये वॉनटेड असलेले दहशतवादी पाकिस्तानातच आय.एस.आय. च्या आश्रयाला असल्याचे पुरावे देऊन देखील पाकिस्तान त्याचा नेहमी इन्कारच करत आला आहे. इथे नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे ओसामा बिन लादेन पाकिस्तानातच लपला आहे हे अमेरिकेने दोन वर्षान आधीच सांगूनही पाकिस्तानने त्याचा इन्कार केला होता व आता तीच गोष्ट उघड झाली आहे. त्यामुळे भारताच्या दाव्यांना देखील पुष्टी मिळाली असून जागतिक समुदायाने पाकिस्तानवर दबाव आणून भारताचे हे गुन्हेगार भारताच्या ताब्यात दयायला पाकिस्तानला भाग पडावे अथवा भारताने अशी लष्करी कारवाई केलीच तर त्याच्या मागे ठांबपणे उभे राहावे.
दहशतवादा विरोधातील कारवाई मध्ये पाकिस्तान हा जगा बरोबर नसून तोच दहशतवाद आणि दहशदवादी पोसत आहे हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे. एक ओसामा बिन लादेन ठार झाला असला तरी असे अनेक लादेन, दाउद, अल झवाहिरी, मौलाना मसूद, कसाब, टायगर मेमन हे पाकिस्तानात राजरोस पणे निर्माण केले जात आहेत. या जगामधून दहशतवादाचा बिमोड करायचा असेल आणि शांती हवी असेल तर पाकिस्तान सारख्या दहशतीच्या पोशिंद्यालाच जबर दहशत बसेल अशी कारवाई त्याच्यावर करावी लागेल.

"टाईम पास"च्या पलीकडे...


फेसबुक हे मैत्रीचे असे साधन (व्यासपीठ) आहे जिथे तुम्हाला मित्र तर मिळतात, पण त्यांच्याशी जोडणारा "भाव" नाही मिळत. चेहरा नसलेले, भावना नसलेले आणि कोणताही संबंध नसलेले नाते इथे जोडले जाते. फ्रेंड्स लिस्ट मधील आकडा तेवढा वाढत जातो परंतु "ओळख" काही वाढत नाही. समोरच्या व्यक्ती विषयी वाटणारा जिव्हाळा..आपलेपणाचा अधिकार फारच कमी लोक निर्माण करतात. "टाईम पास"च्या पलीकडे किंवा आपले "कर्तुत्व" सिद्ध करण्या पलीकडे ऋणानुबंध जपणारे "मनस्वी" फारच कमी. आपल्याला वैयक्तिक पणे भेटणाऱ्या मित्रांना आपण किती वेळ देतो? त्यांची किती वेळा मना पासून विचारपूस करतो? आपल्या स्वताच्या बाबतीत असे कितीजण करतात? या सर्व गोष्टींचा शोध घेतला तर या नात्यांना "व्यवहारी" नात्यां पेक्षा फारच कमी किंमत उरलेली दिसते.
इंटरनेटच्या शोधाने जग जवळ येत चालले आहे असे म्हटले जाते. पण हा जवळीक पणा व्हर्चुअल दुनिये पुरताच मर्यादित आहे. त्या एका फायद्या पलीकडे पाहिलेत तर वैयक्तिक नात्यांची घट्ट पकड या "नेट" च्या नात्यां मध्ये नसते..आणि तरीही आपण वैयक्तिक गाठी भेटीतल्या मित्रां पेक्षा नेट च्या मित्रां बरोबर तासन तास घालवतो.

"माझा मुलगा कोणाच्या अध्यात नाही कि मध्यात नाही, मी त्याला षंढ बनवतोय"


आपला मुलगा कसा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याला घडवतांना प्रत्येक जन आपल्या परीने त्याचे अतिषय लाड करतो, शक्य असेल तेवढ्या चांगल्या गोष्टी त्याला शिकवण्याचा प्रयत्न करतो. आपल्या या प्रयत्नातच आपण त्याला चुकीच्या मार्गाने नेत चाललो आहोत याची जाणीव देखील आपल्याला नसते.
     आपल्या मुलाने चांगल्या प्रकारे जीवन जगावे म्हणून आपण त्याला लहानपणा पासूनच जपत असतो. कोणताही आजार होऊ नये म्हणून अनेक इंजेक्शन्स दिली जातात, पिण्यासाठी उकळलेले पाणी दिले जाते, आणि अनेक प्रकारे त्याची काळजी घेतली जाते. तो घरात असतांना आपण बऱ्याच गोष्टीं पासून त्याला सावध करत असतो. कोणी काही दिले तर ते घ्यायचे नाही, आपली गोष्ट कोणाला द्यायची नाही, शाळेत स्वताचाच डब्बा खायचा, घरातून आणलेलेच पाणी प्यायचे, कोणतीही गोष्ट वाटून घ्यायची नाही हि आपली शिकवणुक असते. नेमकी याच्या उलट परिस्थिती शाळेत असते. शाळेमध्ये शिक्षक त्याला सर्वांशी सहकार्याने वागायला शिकवतात, आपला डब्बा आपल्या मित्रांशी वाटून खावा, नेहमी इतरांना मदत करावी या प्रकारे तो शिकत असतो. आता अश्या विरोधाभासात त्याने नेमके कोणाचे ऐकावे? त्याने नक्की कोणत्या संस्कारात वाढावे? अशा पेच प्रसंगात तो मोठा होत असतो. 
     काही पालक तर आपल्या मुलांचे कौतुक अशा प्रकारे करतात कि ती बाब कौतुक करण्याची आहे कि शरम वाटण्याची याचेही भान त्यांना नसते. आपला मुलगा किती सोजवळ आहे, तो कसा कोणाच्याही अध्यात आणि मध्यात नसतो हे मोठ्या अभिमानाने इतरांना सांगतात. आता अश्या कोणाच्याही अध्यात आणि मध्यात नसणाऱ्याला, कोणाशीही काही देणे घेणे नसणाऱ्याला काय चाटायचाय? अशी नेभळट मुले कोणाच्या काय कामाची? फक्त स्वताच्या घरापुरता विचार करणारी, स्वताच्या बायको-मुलां पलीकडे कोणाशीही काहीही संबंध न ठेवणारी मुले समाजाच्या काय कामाची? मोठ्या पगारात आपले जग छोटे बनवणारी पिढी काय कामाची?
     असाच विचार जर राजमाता जीजाऊनी केला असता तर? माझा शिवबा कोणाच्याही गडाकडे बघणार नाही कि कोणाच्याही किल्ल्यांकडे त्याची नजर जाणार नाही असे त्यांनी म्हटले असते तर? दुसऱ्यांच्या आया-बहिणींचे काही होत असेल तर होऊ दे, देव-धर्म आणि जनतेचे काही होत असेल तर होऊ दे..माझा शिवबा कोणाच्या अध्यातही नाही आणि कोणाच्या मध्यातही नाही असा विचार जर त्यांनी केला असता तर? लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, भगत सिंह, स्वातंत्र्यवीर सावरकर, सुभाषचंद्र बोस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि अशा अनेक स्वताच्या जीवाची परवा न करणाऱ्या महान आत्म्यांनी असा विचार केला असता तर?...तर अजुनही अनेक वर्ष आपल्या पिढ्यांना गुलामगिरीतच षंढा सारखे जगावे लागले असते. असा कोणत्याच अध्यात आणि मध्यात नसणाऱ्याला षंढ नाही तर दुसरे काय म्हणणार?
     माझ्याही माझ्या मुलांकडून अपेक्षा आहेत. त्यांनी त्यांचे घर संसार व्यवस्थित संभाळावे पण सामाजिक बांधिलकीही तशीच ठेवावी. माझी मुले अडल्या-नडल्यांना मदत करणारी तर एखाद्याची अडवणूक करणाऱ्याला आडवी करणारी असली पाहिजेत, भल्यांना त्यांचा आधार तर बुऱ्यांना त्यांची भीती वाटली पाहिजे, सत्त्या साठी आणि समाजहिता साठी दोन घेणारी तर दोन देणारी असली पाहिजेत, त्यांच्याकडे बघणाऱ्या निराधारांना त्यांचा आधार वाटला पाहिजे.

नात्यातील गुंता:स्त्री-पुरुष यांचे प्रेम आणि मैत्री.

हा विषय जवळ जवळ प्रत्येकाशीच​ संबंधित आहे.आज स्त्री-पुरुष अ​सा भेद भाव जसा 
कमी झाला आहे तस​ाच त्यांच्यातील दुरावा देखील ब​ऱ्याच अंशी दुर झाला आहे. पुरुष​ांना जसे स्त्रियांचे आकर्षण अस​ते तसेच स्त्रियांनाही पुरुषांचे असणारच. या आकर्षणातून किं​वा विशिष्ट परिस्थितीमुळे जर त्​यांच्या मध्ये मैत्री निर्माण झ​ाली तर त्या मैत्रीचे निकष वेग ​वेगळ्या पातळीवर लावावे लागतील.​ असो...
एकाच ठिकाणी काम करणारे सहकारी ​किंवा कॉलेजमध्ये शिकणारे तरुण ​तरुणी किंवा इतर कोणत्याही कारण​ाने एकत्र आलेले स्त्री-पुरुष य​ांची मैत्री होणे स्वाभाविक आहे​. अशा मैत्रीमध्ये एकमेकांबद्दल​ प्रेम निर्माण होणे हे देखील स​्वाभाविकच आहे. स्त्री-पुरुष अस​ा विचार करता प्रेमाची दोन प्रक​ारात मांडणी करता येईल. निखळ मै​त्री या नात्याने निर्माण झालेल​े प्रेम आणि दुसरे एकमेकांच्या ​प्रेमात सर्व सीमा दुर होऊन निर​्माण झालेली मैत्री. मैत्री या ​नात्याने निर्माण झालेल्या प्रे​मामध्ये एक मेकांविषयी आत्मीयता​ निर्माण होते, अशा संबंधान मध्​ये दोघांनाही याचे भान असते कि ​आपण आयुष्याचे सोबती होऊ शकत ना​ही आणि आहे या नात्या मध्ये आपल​ी सिमादेखील ओलांडु शकत नाही. य​ाच्या उलट दुसऱ्या प्रेमामध्ये ​कोणतीही सीमा न पाळता स्त्री-पु​रुष एकमेकांना स्वीकारतात...मग ​आयुष्याचे जोडीदार म्हणून किंवा​ ते शक्य नसेल तर आपल्या जोडीदा​रापासून लपऊन. अशा संबंधान मध्य​े एकमेकांविषयी विश्वास निर्माण​ झालेला असतो. ज्या गोष्टी आपण ​आपल्या वैवाहिक जोडीदाराशी बोलू​ शकत नाही किंवा आपले मन मोकळे ​करू शकत नाही ते अशा संबंधान मध​्ये सहज शक्य होते. मैत्रीच्या ​आणि प्रेमाच्या अशा संबंधा मध्य​े स्त्रियांनी अतिशय जपून वागाव​े. पुरुष त्याच्या मैत्रिणी बद्​दल त्याच्या बायकोला कसेतरी सां​गून किंवा तिला कसेही समजलेच तर तिला त्यांच्यातील "संबंध" म​ान्य करायला लावेल(जबरदस्तीने क​ा असेना) किंवा तिच्या विरोधाला​ न जुमानता, पण स्त्री तिच्या प​तीला असे "संबंध" सांगूच शकत ना​ही कारण पुरुषांची त्या संबंधाल​ा कधीच संमती नसणार. पुरुषांनी ​असे संबंध ठेवले तर तो त्यांचा ​उदारमतवादी बाणा असतो आणि त्याच​्या बायकोचा जर असा मित्र असेल ​तर तिला व्यभिचारी ठरवण्याचा त्​याचा दृष्टीकोन असतो.
विवाहित स्त्री-पुरुषांच्या बाबतीत असे मैत्री आणि प्रेमाचे संबंध मानसिक गरज किंवा शारीरिक गरज या कारणाने निर्माण झालेले असतात. स्वताचे काम आणि घर संसार सांभाळता सांभाळता निर्माण झालेला तोच तोच पणा, किंवा काही कारणाने बिघडलेले संबंध या मुळे साहजिकच मन कुठे तरी अस्वस्थ असते. अशातच जर कोणी मित्र-मैत्रीण निर्माण झाले तर त्यांच्या विषयी अधिकच आकर्षण निर्माण होते. नाविण्य असलेल्या अशा संबंधानमध्ये मानसिक आणि शारीरिक समाधान शोधण्याचा दोघांचाही प्रयत्न असतो. अशा संबंधामध्ये काही गोष्टी प्रकर्षाने जपाव्या लागतात. कितीही जास्त जवळीक वाढली तरी वास्तवाचे भान असायला हवे. स्वताचा संसार नवरा-बायको, मुले यांचा विचार मनात असावा. जर शारीरिक संबंध निर्माण होऊन मन त्या व्यक्तीतच गुंतत गेले आणि त्या वेळी स्त्री-पुरुषाने आपल्या संसाराचा विचार नाही केला तर त्यांचे वैवाहिक जीवन धोक्यात येऊ शकते. 

हे सर्व विचार मांडतांना साहजिक​च काहीजन मला विवाहबाह्य संबंधा​चा पुरस्कर्ता समाजातील, पण एक ​वास्तव लक्षात घ्या “Attraction​ between man and women leads to physical relation” and this is universal truth.
प्रेम, मैत्री आणि "लफडे" या तीनही गोष्टी वेग वेगळ्या आहेत. प्रेम आणि मैत्री कशाही प्रकारे निभाऊन नेली जाऊशकते पण "लफड्या" मधे फक्त वासनाच असते आणि त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात.
...आणि सरते शेवटी चांगला नवरा ​कधीच चांगला मित्र होऊ शकत नाही​, तसेच चांगली बायको कधीच चांगल​ी मैत्रीण होऊ शकत नाही.