Tuesday, 23 July 2013

राज्यात ११ लाख ८६ हजार बोगस शिधापत्रिका :- अनिल देशमुख (अन्न व नागरी पुरवठा मंत्री) 20/07/13


राज्यात ११ लाख ८६ हजार बोगस शिधापत्रिका :-
                                               अनिल देशमुख 
(अन्न नागरी पुरवठा मंत्री) 20/07/13
 भ्रष्ट अधिकारी, दुकानदार  रेशन दलाल जबाबदार- माझा आरोप   


          अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे घेण्यात आलेल्या बोगस शिधापत्रिका शोध मोहिमे अंतर्गत अतिशय धक्कादायक बाब समोर आली आहे. या मोहिमेमध्ये राज्यात ११ लाख ८६ हजार बोगस शिधापत्रिका असल्याचे उघड झाले आहे. एवढ्या मोठया प्रमाणात बोगस शिधापत्रिका आढळल्याने त्या वितरीत करणाऱ्या संबंधित निरीक्षकांवर इतर दोषी कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश अन्न नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.
          
साधारण १२ लाख बोगस शिधापत्रिका आढळल्या आहेत असे स्वता मंत्री महोदय आज मान्य करतात. पण  हा काही आताच लागलेला शोध नाही. हि बनवाबनविची प्रक्रिया वर्षानुवर्षे चालत आलेली आहे खालपासून ते वरपर्यंत सर्वांना त्यांचा वाटा कायम मिळत आलेला आहे. बोगस शिधापत्रिका बनविण्यापासुन तर शिधावाटप दुकान मिळविण्यापर्यंत तसेच गोदामातून शिधा वितरीत झाल्या पासून तर ती लाभार्थ्याला मिळता गायब होण्यापर्यंत सर्व ठिकाणी शिधावाटप कार्यालय, दुकानदार दलालांची संघटीत टोळी कार्यरत असते. हि फक्त महाराष्ट्राचीच समस्या नाही तर देशभर सार्वजनिक वितरण व्यवस्थेमध्ये कमी अधिक प्रमाणत अशा टोळ्या कार्यरत आहेत.
            
मंत्री महोदयांनी सांगितलेला बोगस शिधापत्रिकांचा आकडा हा वास्तवात त्याहीपेक्षा जास्त आहे. त्या आकड्यातील सर्वाधिक  बोगस शिधापत्रिका दुकानदार स्वताच तयार करून शिधासाहित्याचा अपहार करण्यासाठी त्या वापरत असतात. या सर्व भ्रष्टाचाराचा तपास खात्यांतर्गत करता सी आय डी मार्फत किंवा न्याय यंत्रणेच्या देखरेखीखाली करण्यात यावा म्हणजे याहीपेक्षा जास्त भयाण असलेली परिस्थिती सर्वांसमोर येइल
            
एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस शिधापत्रिका असल्याचे उघड झाल्यानंतर रेशन विषयक जनजागृती आंदोलन करणाऱ्या संघटनांकडूनहि तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत

No comments:

Post a Comment